1

बेळगावमध्ये सात कोटींच्या बनावट नोटा जप्त, एकाला अटक

देश

बेळगावमध्ये मंगळवारी मध्यरात्री सुमारे ७ कोटींच्या बनावट नोटांचा साठा जप्त करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या क्वार्टसमधून मंगळवारी मध्यरात्री सुमारे ७ कोटी रुपयाच्या ५०० व २००० रुपयाच्या बनावट नोटा पोलिसांनी छापा टाकून जप्त केल्या. याप्रकरणी अजितकुमार निडोणी (रा. विजापूर) याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सुरूवातीला पोलिसांना या खऱ्या नोटा असल्याचे वाटले होते. परंतु, नंतर या बनावट नोटा असल्याचे आढळून आले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून अजित निडोनी (रा. मूळ विजयपूर, कर्नाटक) असे या व्यक्तीचे नाव आहे.
मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सदाशिव नगरमधील पीडल्ब्यूडी वसाहतीतील मंजुनाथ बागलकोटी यांच्या निवासस्थानी धाड टाकली. त्यावेळी त्यांच्या घरात ५०० व २००० रूपयांच्या नोटा आढळून आल्या. या नोटा निवडणुकीत वाटपासाठी आणल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *