200-note-1

एटीएममध्ये दोनशे रुपयांच्या नोटेचा ट्रे लावण्याची प्रक्रिया चालू असल्यामुळे चलन तुटवडा – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

देश

एटीएममध्ये दोनशे रुपयांच्या नोटेचा ट्रे लावण्याची प्रक्रिया चालू असल्यामुळे चलन तुटवडा निर्माण झाला, असं आरबीआयने म्हटलं आहे. आरबीआयने दोनशे रुपयांची नोट जारी केल्यानंतर एटीएमच्या रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया चालू आहे.
एटीएममध्ये ट्रे लावण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्यात आली, मात्र देशातील काही भागांमध्ये यासाठी उशिर झाला. एटीएममध्ये कॅश भरण्यासाठी लॉजिस्टिकची समस्या तर आहेच, शिवाय एटीएम नव्या नोटांसाठी अनुकूल नसल्याने चलन तुटवडा निर्माण झाला, असं आरबीआयचं म्हणणं आहे.
चलनात दोन हजार रुपयांच्या नोटांचा नव्याने पुरवठा करणं बंद केल्याची माहिती केंद्र सरकारने दिली. याचा अर्थ, सध्या चलनात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा बंद होणार नसून, केवळ नव्या नोटांची छपाई आणि वितरण थांबवल्याचं केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आलं.
बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेशसह महाराष्ट्रातील काही भागात एटीएममध्ये खडखडाट जाणवत आहे. नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या स्थितीप्रमाणे अनेक भागात एटीएम ‘कॅशलेस’ झाल्याचं नागरिक सांगत आहेत. मात्र नोटाबंदीनंतर (8 नोव्हेंबर 2016) असलेल्या चलनाच्या तुलनेत सध्या बाजारात खूप जास्त नोटा असल्याचा दावा सरकारने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *