Capture

स्थानिकांनीच आणून ठेवला होता ‘तो’ साप ?

महाराष्ट्र

रस्त्याचं खोदकाम करताना मूर्ती सापडली, तिच्यासोबत साप होता आणि हा चमत्कार असल्याचं समजून ते पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली. बीड जिल्ह्यातील कन्हेरवाडीतील घटनेची दुसरी बाजू समोर आली आहे.
मूर्ती सापडल्याचा जो व्हिडीओ सर्वांना दाखवण्यात आला, त्याच्यापूर्वीचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे.
गावकरी या सापाला हुसकावण्याचा प्रयत्न करतात आणि हुसकावलेल्या सापाला एका काठीने उचलून मूर्तीवर ठेवलं जातं. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होतो, की हा साप मूर्तीसोबत बाहेर निघाला, की साप आणि मूर्तीला एकत्रीतपणे ठेवण्यात आलं.
परळी शहरालगत असणाऱ्या कन्हेरीवाडीत रस्त्याच्या कामासाठी मुरूम खोदकाम सुरू असताना तिथं एक प्राचीन मूर्ती आढळली… विशेष म्हणजे या मूर्तीच्या भोवती कवडी रंगाचे कलिंदर नागराज वेटोळं घालून बसले होते… जेसीबी चालकानं तिथं खोदण्याचा प्रयत्न सुरू केला असता, या नागानं म्हणे फणा वर काढून जोराचा फुत्कार सोडला… नागराजांचा रूद्रावतार पाहून जेसीबी चालकानं तिथून पळ काढला. जेसीबी मागं घेतल्यानंतर तो नाग पुन्हा मूर्तीला वेटोळं घालून बसल्याचं सांगितलं गेलं.
खोदकामात सापडलेल्या या मूर्तीची पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. ही मूर्ती विष्णूची नसून सूर्यनारायणाची असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. या मूर्तीच्या दोन्ही हातात कमळाचे फुल असल्यामुळे ही मूर्ती सूर्याचीच असल्याचं पुरातत्व खात्याचं म्हणणं आहे. विष्णूच्या हातात शंख, चक्र, गदा,आणि पद्म असते. तर सूर्याच्या दोन्ही हातात कमळाचे फुल असतं. अर्धवट तुटलेली ही मूर्ती अनेक वर्षांपूर्वी या ठिकाणी ठेवण्यात आली असावी… आणि ती कालांतरानं जमिनीत पुरली गेलेली असावी, असं पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अजित खंदारे यांनी म्हटल आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *