c24f5cb5-5d0b-492b-9505-d248e9594ef5

दगडुशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

महाराष्ट्र

वैशाख शुद्ध तृतीयेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो.अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर तब्ब्ल ११ हजार आंब्यांचा नैवेद्य ठेवण्यात आला आहे.श्रीगणेशाच्या मूर्तीच्या सभोवतालच्या सर्व दिशात हापूस आंबे ठेवण्यात आले आहे. आंब्यांच्या राशीतले गणेशाचे दर्शन घेण्यासाठी बुधवारी पहाटेपासून भाविकांच्या रांगा लागल्याचे दृश्य बघायला मिळत आहे.
श्रीमंत दगडुशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये गणपती बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. पुण्यातील आंब्यांचे व्यापारी देसाई बंधु आंबेवाले यांच्यावतीने हा नैवेद्य देण्यात आला.
अक्षय तृतीयेच्या दिवशी शेतीच्या कामांना सुरुवात करतात.काही ठिकाणी हा सण ‘आखाती’ या नावानेही ओळखला जातो. या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य अक्षय म्हणजे कमी न होणारे असते असे मानले जाते. या दिवशी सोने, गाडी, इलेकट्रोनिक वस्तू यांचीही खरेदी मोठ्या प्रमाणावर केले. या दिवसापासून अनेक घरात आंबे खाण्यास प्रारंभ केला जातो.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *