90352-gold

अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताला सोने खरेदीसाठी ग्राहकांची लगबग

मुंबई

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या आजच्या, बुधवारच्या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मौल्यवान धातूतील दरचकाकी पुन्हा एकदा तेजाळली आहे. मुहूर्ताच्या सोने खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. दरम्यान, मुंबईत सोन्याचा भाव तोळ्यामागे ३१ हजार रुपयांपुढे गेलाय. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने अनेकजण सोने खरेदी करत आहेत. त्यामुळे सोने दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
गेले दोन दिवस सोने बाजारात घसरण पाहायला मिळाली. सोन्याचा दर ३० हजार ते ३१,५०० घरात होता. मात्र गेल्या वर्षीपेक्षा यंदा सोने खरेदी अधिक होण्याची शक्यताही वर्तविली गेली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे गुंतवणूकदारांचा सोन्याकडे कल वाढत असल्याने ही दर वाढण्याचा अंदाज आहे.मात्र, साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या आजच्या, बुधवारच्या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सोन्याला झळाली मिळाली आहे. शहरात सोन्याचा भाव तोळ्यामागे ३२ हजार रुपये एवढा राहिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *