President-Ramnath-Kovind-620x400

‘स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही देशात महिला असुरक्षित, अशा प्रकारची घटना घडणे लज्जास्पद-राष्ट्रपती रामनाथ कोविंद

देश

कठुवा सामुहिक बलात्कार प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटत आहेत. त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यातच आता या विषयी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. देशातल्या कोणत्याही भागात अशा प्रकारची घटना घडणे लज्जास्पद असल्याची उद्विग्नता राष्ट्रपतींनी व्यक्त केली आहे. आपला समाज नेमका कुठे जातोय, याचा विचार आता आपण करायला हवा, असेही त्यांनी म्हटले. ते जम्मू काश्मीरमधील श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या सहाव्या पदवीदान समारंभात बोलत होते.

‘देशामध्ये अशी घटना घडणे अतिशय लज्जास्पद आहे. आपण कोणता समाज निर्माण करत आहोत, याचा विचार आता करायला हवा. कोणत्याही मुलीसोबत, महिलेसोबत असा प्रकार घडू नये, याची काळजी आपण सर्वांनीच घ्यायला हवी,’ असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले. याआधी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीदेखील महिलांविरोधातील वाढत्या गुन्ह्यांबद्दल चिंता व्यक्त केली.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *