ATM

चार राज्यात नोटांचा तुटवडा,एटीएमच्या बाहेर NO CASH चे फलक

देश

देशातील अनेक राज्यांमधील एटीएममध्ये गेल्या काही दिवसांत कॅश उपलब्ध नसल्याने नोटाबंदीसारखी समस्या निर्माण झाली आहे.विशेषतः बिहार, गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधील शहरांतल्या एटीएममध्ये अचानक कॅशचा तुटवडा जाणवत आहे. एटीएमच्या बाहेर NO CASH असे फलक लावण्यात आले आहेत. रोख रकमेसाठी नागरीक वारंवार एटीमच्या चकरा मारत आहेत. पण पैसे मिळत नसल्याने, नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
नागरीक आता बॅंकेत कमी प्रमाणात कॅश जमा करतात,त्यामुळे बॅंकेतच पैसे कमी आहेत. परिणामी एटीएममध्ये गरजेनुसार पैसे टाकले जात नाहीत. बॅंकेतून जेवढे पैसे बाहेर जातात तेवढे परत येत नाहीत. कारण, बॅंकेत कॅश जमा करण्याचं प्रमाण कमी झालं आहे.
आसाम, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये लोकांनी गरजेपेक्षा जास्त रोकड काढल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं रिझर्व्ह बँकेच्या सूत्रांनी सांगितले. सणासुदीच्या काळात कॅशला आलेल्या मागणीमुळे आत्ता नोटांचा तुटवडा असल्याचं सांगितलं जात आहे.लवकरच परिस्थिती पूर्वपदावर येईल अशी आशा रिझर्व्ह बँकेने व्यक्त केली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *