Plastic-ban

प्लास्टिकबंदीच्या निर्णयावर स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार

मुंबई

प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापरावर बंदी घालण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी नकार दिला. हायकोर्टाने प्लास्टिक पिशवी, बॉटल व थर्माकोल वापरणाऱ्यांना त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देखील दिली आहे.
राज्य सरकारच्या तरतुदीनुसार ग्राहक, वितरक आणि उत्पादक अशा सर्वांनी तीन महिन्यांत त्यांच्याजवळ असलेला प्लास्टिकचा साठा दिलेल्या निर्देशांनुसार प्रशासनाकडे जमा करावा, असं हायकोर्टाने सांगितलं.
प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाचं, मानवी तसेच प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून पर्यावरणाचे हे नुकसान रोखण्यासाठी आणि त्याचे संवर्धन करण्यासाठी प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापरावर बंदी घालण्यात आल्याचा दावा राज्य सरकारने सुनावणीच्या वेळी केला होता.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *