2018-04-12-1

६५ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार; ‘कच्चा लिंबू’ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

मनोरंजन

६५ व्‍या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा आज करण्‍यात आली. चित्रपट क्षेत्रातील विविध विभागांसाठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्‍यात कच्‍चा लिंबू हा सर्वोत्‍कृष्‍ट मराठी सिनेमा ठरला तर न्‍यूटनला सर्वोत्‍कृष्‍ट हिंदी चित्रपटाचा पुरस्‍कार जाहीर झाला.
‘मृत्यूभोग’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर, सुयश शिंदेच्या ‘मयत’ला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सर्वोत्कष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार प्रसाद ओकच्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाला जाहीर झाला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि रवी जाधव यांच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांसोबतच राष्ट्रीय पुरस्कारांच्या ज्युरींचीही मनं जिंकली असं म्हणायला हरकत नाही. तर मराठमोळा निर्माता अमित मसुरकर यांचा ‘न्यूटन’ हा हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. याच चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेते पंकज त्रिपाठी यांनाही राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. ‘म्होरक्या’ या मराठी चित्रपटाला विशेष कामगिरी पुरस्कार मिळाला आहे. सुयश शिंदे दिग्दर्शित ‘मयत’ या शॉर्ट फिल्मला सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. नागराज मंजुळेंच्या ‘पावसाचा निबंध’ या लघुपटाचा यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे.
३ मे २०१८ रोजी हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *