59c3d6873c8c4

धक्कादायक ! थंड पेयांमध्ये वापरला जाणारा ९८ टक्के बर्फ दूषित !

मुंबई

उन्हाळा असल्यामुळे शरीराला थंडावा मिळवण्यासाठी अनेक जण रस्त्यावरील ज्यूस किंवा बर्फाच्या गोळ्याचा पर्याय निवडतात. मात्र, या सरबतांमधला बर्फ तुमच्या शरीरासाठी अपायकारक ठरु शकतो. कारण मुंबईत रस्त्यावरील बर्फाचे ९८ टक्के नमुने दूषित आढळले आहेत.
मार्च महिन्यात उन्हाळ्याला सुरुवात झाली की रस्त्यांवरील थंडगार पेयपदार्थाच्या गाडय़ा आणि त्यांच्यासमोरील गर्दी वाढू लागते. भर उन्हात गारेगार पेयपदार्थासाठी मोठय़ा प्रमाणात बर्फ वापरला जातो. मुंबईत खाद्य बर्फाचा एकमेव कारखाना असून मासे तसेच इतर पदार्थाच्या साठवणुकीसाठी कारखान्यात तयार होणारा अखाद्य बर्फच या गाडय़ांवर वापरला जातो. त्याचप्रमाणे लहान-मोठय़ा उपाहारगृहांमध्येही हाच बर्फ वापरला जात असल्याचे आढळले आहे.
दर वर्षी महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याकडून या बर्फाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येते. या वेळी आरोग्य विभागाने बर्फ विक्रेते, उपाहारगृह, उसाच्या रसाची दुकाने, बार, रस्त्यावरील गोळेवाले, पेयपदार्थ विक्रेते, फळांचे रसविक्रेते, लस्सी, ताक- लिंबू सरबत विक्रेते तसेच फास्ट फूड विक्रेते, डेअरी यांच्याकडील बर्फाचे नमुने तपासले.
या दूषित बर्फाच्या सेवनामुळे पोटाचे विकार, जुलाब, संसर्ग होण्याची शक्यता आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *