Tejaswini-Sawant-New

तेजस्विनी सावंतची राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये रौप्यपदकाची कमाई

क्रीडा

कोल्हापुरातील तेजस्विनी सावंतने ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्यपदकाची कमाई कमाई केली आहे. तेजस्विनीने ५० मीटर रायफल प्रकारात ६१८.९ गुणांची कमाई करत रौप्य पदक पटकावले आहे.
तेजस्विनी सावंतचे राष्ट्रकुल स्पर्धेतील हे सहावे पदक आहे. यापूर्वी तेजस्विनीने २००६ मध्ये मेलबर्नमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत १० मीटर एअर रायफल आणि १० मीटर एअर रायफल(पेअर्स) प्रकारात सुवर्ण पदकांची कमाई केली होती. याव्यतिरिक्त २०१० साली नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत तेजस्विनीने ५० मीटर रायफल प्रकारात रौप्य पटकावर आपले नाव कोरले होते.
तेजस्विनी सावंतने गोल्ड कोस्टमध्ये सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली असून तेजस्विनीने एकाच प्रकारात दोनदा पदक जिंकली आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *