599213-best-buses-080717

आजपासून बेस्टची भाडेवाढ लागू

मुंबई

मुंबईकरांच्या खिशाला आजपासून (गुरुवार) कात्री लागणार आहे. कारण, बेस्ट बसची भाडेवाढ आजपासून लागू होणार आहे.मुंबई महापालिकेनं यापूर्वीच ही भाडेवाढ मंजूर केली होती. त्याची अंमलबजावणी आजपासून होणार आहे.
बेस्टचा आर्थिक डोलारा सावरण्यासाठी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी उपक्रमामध्ये काही आर्थिक सुधारणा सुचविल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून उपक्रमाच्या तिकीट दरांत वाढ प्रस्तावित करण्यात आली होती. तिला बेस्ट समिती व पालिका सभागृहाकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणानेही भाडेवाढीस परवानगी दिली. त्यामुळे गुरुवार, १२ एप्रिलपासून ही भाडेवाढ अमलात आणण्याचे जाहीर करण्यात आले.

अशी असणार भाडेवाढ :

६ किमीसाठी सध्या भाडे- १४ रु, प्रस्तावित भाडे- १५ रु.

८ किमीसाठी सध्या भाडे- १६ रु, प्रस्तावित भाडे- १८ रु.

१० किमीसाठी सध्या भाडे- १६ रु, प्रस्तावित भाडे- २२ रु.

पासच्या किंमतीतही पहिल्या चार किमीसाठी कोणतेही बदल नाही. त्यापुढे ४० रु. ते ३५० रु भाडेवाढ प्रस्तावित.

शालेय विद्यार्थ्यांच्या पास किंमतीत चार किमीपर्यंत बदल नाहीत, त्यापुढे ५० ते १०० रु वाढ प्रस्तावित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *