b466030cc8195d7210b0c08cf3271e8d

पिठाच्या गिरणीत ओढणी अडकून महिलेचा मृत्यू

महाराष्ट्र

मेसमध्ये काम करणारी महिला चक्कीच्या सहाय्याने कणिक तिंबत असताना अचानक तिची ओढणी त्यातील पात्यांमध्ये अडकली. काही कळण्याच्या आत महिला चक्कीमध्ये ओढली गेली. यात चेहरा आणि डोक्याला गंभीर जखम झाल्याने तिचा मृत्यू झाला.
पुण्यातील गोखले नगर परिसरात सुप्रिया प्रधान या मेस चालवत होत्या. आज संध्याकाळी पीठाच्या गिरणीत काम करताना त्यांची ओढणी गिरणीत अडकली. त्यामुळे त्या गिरणीच्या यंत्रात ओढल्या गेल्या. तिथे उपस्थित असलेल्या महिलांनी त्यांना बाहेर काढून जवळच्याच रत्नाकर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
सुप्रिया यांचे पती खासगी नोकरीमध्ये आहेत, तर त्यांना दोन मुले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *