accident

मंगळवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.कर्नाटकमधून शिरवळ एमआयडीसीमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या टोम्पोला हा अपघात झाला आहे. साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जाताना खंबाटकी घाट ओलांडल्यावर खंडाळा बोगद्याजवळ एका नागमोडी वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असेल्या लोखंडी बॅरिकेट्सला जोरदार धडक देऊन हा टेम्पो पलटी झाला. यामधील १३ मजूरांचा जागीच तर ५ जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला, तसेच १३ जण जखमी झाले आहेत. पोलिसांना अपघाताची माहिती कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात हालवले.
नागमोडी वळण असल्याने चालकाचे नियंत्रण गेल्याने हा अपघात झाल्याचे कळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *