Shetkari

कर्जाला कंटाळून यवतमाळमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

महाराष्ट्र

३ लाखांचे कर्ज डोंगर वाटल्याने आणि नापिकी त्यातून येणारी निराशा या सगळ्याला कंटाळून यवतमाळच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. आपल्या सुसाइड नोटमध्ये या शेतकऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव लिहिले आहे. शंकर भाऊराव चायरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
घाटंजी तालुक्यातील राजूरवाडीचे रहिवासी होते. सहा पानी सुसाइड नोटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव लिहून शेतकऱ्याने आपले आयुष्य संपवले आहे. शंकर चायरे यांनी गळफास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातून ते वाचले. त्यानंतर विष प्राशन करून त्यांनी आपले आयुष्य संपवले यातच त्यांचा मृत्यू झाला.

शंकर भाऊराव चायरे यांची सहा एकर शेती होती. त्यांनी यावर्षी कापूस आणि तूर याची लागवड केली होती. मात्र बोंड अळीने त्यांचे सगळे पिक उद्धवस्त केले. त्याआधी २०१६-१७ या वर्षातही त्यांच्यावर ८० हजारांचे कर्ज होते. या सगळ्यातून आलेल्या निराशेतून आणि हतबलतेतून शंकर चायरे यांनी त्यांचे आयुष्य संपवले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *