4bribe_18

लाच स्वीकारताना पशुधन विकास अधिकाऱ्यास अटक

महाराष्ट्र

बुलडाण्यातील एका शेतकऱ्याकडून बैलावर उपचार करण्यासाठी क्लासवन दर्जाच्या पशुधन विकास अधिकाऱ्याने चक्क १५० रूपयांची लाच घेतली. नडलेल्या शेतकऱ्याकडून १५० रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या डॉक्टरला रंगेहाथ पकडले. डॉ. रमेश बाजीराव पाचारणे (वय ५१, रा. जांभरून रोड, बुलडाणा) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ही घटना आज (दि.१० एप्रिल) दुपारच्या सुमारास घडली.
धाड परिसरातील एका शेतकऱ्याच्या बैलाला शेतात वखरणी करताना उजव्या पायास वखराची लोखंडी पास लागून हा बैल जखमी झाला होता. या बैलाच्या जखमेवर उपचार करण्यासाठी धाड येथील वर्ग एक श्रेणीच्या दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी (वर्ग एक) रमेश बाजीराव पाचरणे याने तीन वेळा उपचार करून व्हीजीट फिच्या नावाखआली तक्रारकर्त्या शेतकऱ्याकडून दोन हजार २०० रुपये घेतले होते. नऊ एप्रिल रोजी शेतकरी पुन्हा बैलाच्या पायावर उपचार करण्यासाठी पशुधन विकास अधिकाऱ्यास बोलवण्यास गेले होते. तेव्हा डॉ. पाचरणे यांनी दहा एप्रिल रोजी १५० रुपये घेऊन या असे सांगत नंतर उपचार करतो अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे शेतकऱ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तशी तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी दहा एप्रिल रोजी करण्यात आली. त्यात बैलाच्या जखमेवर उपचार करण्यासाठी दीडशे रुपयाची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे धाड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला होता. त्या दरम्यान, तक्रारदार शेतकर्याकडून दीडशे रुपये पंचासमक्ष स्वीकारून रमेश पाचरणे याने ते त्याच्या मनी पॉकेटमध्ये ठेवले होते. प्रकरणी पैसे घेताना त्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले व लाचेची रक्कम त्यांच्याकडून हस्तगत केली.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *