schoolbus-accident

शाळेची बस दरीत कोसळून २० शाळकरी मुलांचा मृत्यू

देश

हिमाचल प्रदेशच्या कांगरा जिल्ह्यातील नुरपूर भागात एका शाळेच्या बसला भीषण अपघात झाला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार या दुर्घटनेत ड्रायव्हरसह २० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भिती आहे. विद्यार्थ्यांनी भरलेली ही शाळेची बस दरीत कोसळली आहे. या बसमध्ये एकूण ६० मुले होती. ४० जण जखमी झाले आहेत. नुरपूर जवळच्या मलकवाल भागात सोमवारी संध्याकाळी ४.३० च्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, खासगी शाळेची ही बस शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी घरी सोडण्यासाठी जात होती. नूरपूर-मलकवालजवळ बस पलटल्यानंतर १५० फूट दरीत कोसळली. बसमध्ये नर्सरीपासून पाचवी पर्यंतचे एकूण ६० विद्यार्थी होते. मृत मुलांचे वय १० वर्षापेक्षा कमी आहेत. जखमी विद्यार्थ्यांना पठानकोट येथील खासगी रुग्णालयात तर काहींना नुरपूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याविषयी अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *