murder-istock_650x400_71470732799

सांगलीच्या तासगाव तालुक्यातील वज्रचौडे गावात महिलेने आपल्या तीन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुनीता राठोड असे या विवाहितेचे नाव असून त्या मूळच्या कर्नाटकमधील विजापूरच्या आहेत. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकलेले नाही.
तासगाव तालुक्यातील वज्रचौंडे येथे सुनीता राठोड आणि त्यांच्या कुटुंबीयांचे वास्तव्य होते. सुनीता या विजापूरच्या असून रस्त्याच्या कामासाठी राठोड कुटुंबीय वज्रचौंडे येथे आले होते. सोमवारी सकाळी सुनीता राठोड यांनी तीन लहान मुलींसह विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकलेले नाही. कौटुंबिक वादातूनच त्यांनी हे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *