image

भारतीय बॅडमिंटनपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई

क्रीडा

ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंनी उल्लेखनीय कामगिरी बजावत अप्रतिम खेळाचं प्रदर्शन केलं आहे. सांघिक प्रकारच्या सामन्यांमध्ये भारतीय संघातील खेळाडूंनी मलेशियाच्या संघावर ३- १ अशा गुणसंख्येने मात केली. मलेशियाच्या संघावर मात करत भारतीय संघाने सुवर्णपदकाची कमाई इतिहास रचला आहे.
राष्ट्रकुल स्पर्धांमधील सांघिक बॅडमिंटन प्रकारात भारतीय संघाने पहिल्यांदाच सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. भारतीय संघाकडून मिश्र दुहेरीमध्ये सात्विक रणकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा, पुरुष एकेरीमध्ये किदंबी श्रीकांत आणि महिला एकेरी सामन्यामध्ये सायना नेहवाल या खेळाडूंच्या कामगिरीमुळे हे यश संपादन करणं सहज शक्य झालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *