Naxal

छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानांच्या बसवर नक्षलवाद्यांचा हल्ला, २ जवान शहीद

देश

छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानांच्या बसवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात २ जवान शहीद झाले असून ५ जण जखमी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छत्तीसगड दौऱ्यापूर्वीच विजापूर येथे नक्षलवाद्यांनी साखळी बॉम्बस्फोट केले. स्फोटामुळे विजापूरच्या मुख्य मार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. नक्षलवाद्यांनी जवानांच्या बसमध्येही स्फोट केला.
त्यानंतर सीआरपीएफचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये गोळीबार झाला. हा हल्ला विजापूरच्या महादेव घाटी आणि चिन्नाबोडकेल येथे झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या स्फोटाच्या माध्यमातून जवानांवर हल्ला करण्याची नक्षलवाद्यांचा कट होता.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *