Untitled-1

अब्रू वाचविण्यासाठी १२ वर्षीय मुलीची इमारतीवरुन उडी

मुंबई

मुंबईजवळच्या नालासोपाऱ्यात ही धक्कादायक घटना घडली. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने छेडछाड करणाऱ्या नराधमाच्या तावडीतून सुटण्यासाठी, एका अल्पवयीन मुलीने टेरेसवरुन उडी मारली.
पत्ता विचारण्याचा बाहाणा करुन इमारतीच्या गच्चीवरुन एका १२ वर्षीय मुलीला नेले. मात्र, ३५ वर्षांच्या अनोळखी व्यक्तीने या अल्पवयीन मुलीचे छेड काढण्यास सुरुवात केले. त्याने थेट कपड्यांना हात घातल्याने मुलीने आपली अब्रू वाचविण्यासाठी चार मजली इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारली.त्यावेळी खाली उभ्या असलेल्या लोकांना याचा अंदाज आल्याक्षणी, त्यांनी तिला चादरीमध्ये झेलण्याचा प्रयत्न केला. मात्र या झटापटीत तिला गंभीर दुखापत झाली. पण सुदैवाने तिचा जीव वाचला आहे.
इमारतीवरुन उडी मारणारी अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. याप्रकरणी तुलिंज पोलीस ठाण्यात छेडछाड आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ३ एप्रिल रोजी ही घटना घडली असून पीडित मुलीवर मुंबईतील नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिच्या कंबरचे हाड मोडले असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *