nitin-gadkari

नवभारताची निर्मिती करुन तंत्रज्ञानाचा वापर करत विकास साधायचा आहे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

रोजगार

आम्हाला नवभारताची निर्मिती करायची आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन विकास साधायचा आहे. 4 कोटी लोकांच्या घरात वीज नव्हती. आज आम्ही 50 टक्के काम पूर्ण केलं आहे. 2019 पर्यंत 8 कोटी लोकांच्या घरी सिलेंडर पोहचेल असा दावा त्यांनी केला. 31 कोटी लोकांनी जन धन योजनेत खाती उघडली.
काही लोक महाराष्ट्रावर राज्य करणे आपला अधिकार समजत होते. ते निराश झालेत. जे प्रकल्प बंद पडलेत ते एक वर्षात पूर्ण करू. सर्व सिंचन प्रकल्प पूर्ण करु. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पाण्याची समस्या होणार नाही. महाराष्ट्रात 1 लाख कोटी रुपये सिंचनासाठी दिलेत असे त्यांनी सांगितले.
गरीबीला जात, धर्म पंथ नसतो. आम्ही योजना लागू करताना कधी धर्माचा, जातीचा विचार केला नाही. आम्ही कधीच धर्म, जातीचे राजकारण केले नाही असे भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्यात ते बोलत होते.
नदीजोड प्रकल्पासाठी 40 हजार कोटी रुपये खर्च करत असून उत्तर महाराष्ट्रात व मराठवाड्यात पाण्याचा दुष्काळ उरणार नाही असं ते म्हणाले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *