f06a14d655beecb6dc6be49d6981d44e

भाजपाच्या महामेळाव्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी,सर्वसामान्य मुंबईकरांना मोठा मनस्ताप

मुंबई

भारतीय जनता पक्षाच्या ३८ व्या स्थापना दिनानिमित्त आज मुंबईत भव्य मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या कार्यक्रमामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना मोठा मनस्ताप होत आहे.आजच्या मेळाव्यासाठी राज्यभरातून भाजपाचे कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. या मेळाव्यासाठी राज्यभरातून ५ लाख कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र, वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे सध्या या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.पश्चिम द्रूतगती मार्गावर कालपासून मोठी वाहतूक कोंडी होत आहे. काल अमित शाहांच्या स्वागतासाठी भाजपने सांताक्रूझ विमानतळ ते बीकेसीपर्यंत बाईक रॅली काढली होती. मात्र यामुळे तब्बल ४ ते ५ तास वाहतूक रखडली होती.
आज सकाळीदेखील वाहतूक कोंडीचे हे चित्र कायम आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. वांद्रे टर्मिनसहून बीकेसीकडे जाण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना बस मिळते. पण सामान्य मुंबईकरांना बस मिळत नाही. त्यामुळे संतापलेल्या मुंबईकरांनी बीकेसीकडे जाणारी भाजप कार्यकर्त्यांची बस अडवली. त्यानंतर पोलिसांनी याठिकाणी येऊन या नागरिकांना दूर केले. परंतु, नागरिकांनी पोलिसांशी प्रचंड हुज्जत घातली. यावेळी त्यांनी वाहतूक कोंडीबद्दल प्रचंड संताप व्यक्त केला. परंतु, पोलिसांकडून मात्र वाहतूक सुरळीत असल्याचा दावा करण्यात आला.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *