526605-reliancejio789

JIO धमाका ! IPL प्रेमींसाठी फ्रीमध्ये मिळणार ही सुविधा

व्यापार

देशातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आयपीएलची सर्वच आतुरतेने वाट पाहात आहेत. आयपीएलच्या याच लोकप्रियतेचा फायदा उचलण्याची तयारी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने केली आहे. आयपीएलची भारतातील क्रेझ पाहता दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने बुधवारी नव्या लाईव्ह मोबाईल गेम आणि क्रिकेट कॉमेडी शोची घोषणा केली. कंपनीने स्पेशल पॅक लाँच केलाय. यात २५१ रुपयांत ५१ दिवसांसाठी जिओ टीव्हीवर लाईव्ह मॅच पाहता येणार आहेत. या पॅकमध्ये १०२ जीबी डेटा आहे. हा लाईव्ह मोबाईल गेम जिओ क्रिकेट प्ले लॉगला देशातील कोणत्याही स्मार्टफोनवर खेळता येणार आहे. ११ भाषांमध्ये ७ आठवडे ६० सामने असतील. कंपनीच्या माहितीनुसार, या गेममध्ये विजेत्यांना मुंबईत घर, २५ कार आणि कोट्यवधी रुपये रोख रकमेची बक्षिसे मिळणार
जिओ सात एप्रिलपासून आपल्या माय जिओ अॅपवर ‘धन धना धन लाइव्ह’ कार्यक्रमाची सुरूवातही करणार आहे. हा कार्यक्रम माय जिओ अॅपवर एक्सक्लुजिवली दाखवण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जिओ आणि बिगर जिओ ग्राहकांसाठीही पूर्णपणे मोफत असेल. प्रसिद्ध विनोदी कलाकार सुनील ग्रोव्हर आणि क्रीडा सूत्रसंचालक समीर कोच या कार्यक्रमाचे संचलन करतील. तसंच जिओने एक क्रिकेट सीझन पॅक आणला आहे. यामध्ये ग्राहक आपल्या मोबाइलवर लाइव्ह सामना पाहू शकेल.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *