DZ9HxWfX4AElAVM

भरतीच्या पाण्यात अडकले तरुण-तरुणींचे पोलिसांनी वाचवले प्राण

मुंबई

मुंबईत वांद्रेच्या बँडस्टँड परिसरातील ताज हॉटेलसमोर बुडणाऱ्या 11 जणांना वाचवण्यातपोलिसांना यश आलं आहे.असह्य करणाऱया उकाडय़ातून थोडा थंडावा मिळावा म्हणून सात तरुण व चार तरुणी वांद्रे किल्ला येथील समुद्रकिनाऱयावर निवांत बसले होते. गप्पांच्या नादात ते भरतीच्या पाण्यात कधी अडकले हे त्यांना कळलेच नाही. पाणी वाढल्याने बाहेर येण्याचा मार्गच बंद झाला. मदत मिळावी यासाठी सर्वजण जीवाच्या आकांताने आरडाओरड करू लागले. हे कळताच मुंबई पोलिसांनी स्वत:च्या जीव धोक्यात घालून त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढले.
ओहोटी असल्याने अनेकजण समुद्रातील खडकांवर जाऊन बसले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक समुद्राचे पाणी वाढल्याने संबंधित तरुण-तरुणी अडकून पडले. मग बचावासाठी सर्वांची खटपट सुरू झाली. मदत करा म्हणून ते ओरडू लागले. तेवढय़ात एकाने लगेच एकाने १०० नंबरवर कॉल करून पोलिसांची मदत मागितली. मदतीचा कॉल मिळताच तेथे बंदोबस्तावर असलेले वांद्रे पोलीस ठाण्याचे एपीआय महेश गुरव व अंमलदार बिराजदार यांनी घटनास्थळी धाव घेतली व सर्वांना खडकावरच उभे राहण्याचे आवाहन करून त्यांना धीर दिला.नंतर लगेच सागरी पोलिसांच्या स्पीड बोटीवर तैनात अजित शिंदे, समीर भोईर, नंदू बाळ शिंदे यांनी स्वतः पाण्यात झोकून देत तो खडक गाठला. मग सर्वांना लाईफ जॅकेट घालून सर्व तरुण-तरुणींना सुखरूप समुद्रातून बाहेर काढले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *