large

चित्रपटगृहांत खाद्यपदार्थ स्टॉल्सवर बंदी घालणार का?

महाराष्ट्र

मुंबईसह राज्यभरातील मल्टीप्लेक्स चित्रपटगृहांमध्ये विकले जाणारे अन्नपदार्थ अव्वाच्या सव्वा किमतीत का विकले जातात? असा प्रश्न हायकोर्टाने उपस्थित केला आहे. तसंच जर लोकांना त्यांच्या घरचे अन्नपदार्थ मल्टीप्लेक्समध्ये आणू जाऊ दिले जात नाहीत तर मग तिकडे खाजगी व्यावसायिकांना अन्नपदार्थ विकण्याची परवानगी कशी दिली जाते? असा हायकोर्टानं राज्य सरकारला प्रश्न विचारला आहे.तसेच उच्च न्यायालयाने मल्टिप्लेक्स चित्रपटगृह मालकांच्या मनमानीबाबत बुधवारी नाराजी व्यक्त केली.
जैनेंद्र बक्षी यांनी या संदर्भात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मल्टीप्लेक्समध्ये तिथले महागडे अन्नपदार्थच विकत घ्यावे लागतात, कारण तिथं घरगुती अन्नपदार्थांना आत नेण्यास मनाई असते, असं याचिकेत म्हणण्यात आलं आहे. एखाद्या व्यक्तीला प्रकृतीच्या कारणामुळे जर बाहेरचं अन्न चालत नसेल, तर त्यालाही बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्याची सक्ती का? असा आक्षेपही याचिकेत नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे मल्टीप्लेक्समध्ये घरगुती अन्नपदार्थ नेण्याची परवानगी द्यावी, अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *