bombay-hc-759131

टेस्टट्युब प्रक्रियेद्वारे जन्म घेतलेल्या मुलांना वडिलांच्या नावाची गरज नाही – हायकोर्ट

महाराष्ट्र

टेस्टट्युब प्रक्रियेद्वारे जन्म घेतलेल्या मुलांना वडिलांच्या नावाची गरज नाही, त्यासाठी देण्यात येणाऱ्या जन्म दाखल्यात वडिलांच्या नावाचा रकाना रिकामा ठेवण्यात यावा, असे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे. एका प्रकरणामध्ये सुनावणी करताना कोर्टाने यासंदर्भात मुंबई महापालिकेला तसे आदेश दिले आहेत.
पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथील एका महिलेने एका वीर्यदानाच्या मदतीने टेस्टट्युब प्रक्रियेतून ऑगस्ट २०१६मध्ये एका मुलाला जन्म दिला होता. मात्र, याचिकाकर्त्या महिलेने आपल्याला वीर्यदान करणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा खुलासा करायचा नाही असे म्हटले होते. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या संबंधीत वॉर्ड कार्यालयाला वडिलांचे नाव नसलेला नवा जन्म दाखला देण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी संबंधीत महिलेने केली होती.

आपल्या याचिकेत या महिलेने २०१५ मधील कोर्टाच्या एका निर्णयाचा दाखला दिला आहे. यामध्ये म्हटले होते की, जर कोणी अविवाहित महिला आपल्या मुलांच्या जन्मदाखल्यासाठी अर्ज करते किंवा यासंदर्भात याचिका दाखल करुन मुलाच्या वडिलांचे नाव प्रसिद्ध करण्याला विरोध दर्शवत असेल तर तिच्या इच्छेचा सन्मान करायला हवा तसेच तिच्या मुलांच्या जैवीक पित्याच्या नावाचा आग्रह धरायला नको असे कोर्टाने या निकालात म्हटले होते.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *