282048-116512-behala-son

धक्कादायक ! ८५ वर्षीय आईचा मृतदेह ठेवला तीन वर्ष फ्रीजमध्ये

देश

कोलकात्यात एका व्यक्तीने आपल्या आईचा मृतदेह तीन वर्षांपासून फ्रीजमध्ये ठेवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी 45 वर्षीय आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे.
या प्रकरणातील आई ८५ वर्षाची असून बीना मजूमदार असं त्या मृत महिलेचं नाव आहे. तर ४५ वर्षाचा सुब्रत मजुमदार असं त्या मुलाचं नाव आहे. घरातील फ्रीजमध्ये सुब्रतने आपल्या आईचा मृतदेह ठेवला होता. हा आरोपी मुलगा फूड कॉरपोरेशन ऑफ इंडिया येथे काम करत आहे.
गुरूवारी सकाळी दुर्गंध आल्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. घराची छडती घेताना पोलिसांना देखील अतीप्रमाणात दुर्गंध येत होता. तेव्हा त्यांना घरातील फ्रीजमध्ये वृद्ध महिलेचा मृतदेह सापडला.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *