SALMANKHAN

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयाने गुरूवारी अभिनेता सलमान खानला दोषी ठरवले. तर या प्रकरणातील सहआरोपी अभिनेता सैफ अली खान, तब्बू, निलीमा आणि सोनाली बेंद्रे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
दरम्यान,काळवीट शिकार केसमध्ये अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी सलमानविरोधात जोधपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालय आता सलमान खानला किती वर्षांची शिक्षा सुनावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायाधीशांनी सलमानला तीन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा सुनावल्यास हे प्रकरण सत्र न्यायालयात जाईल. तसेच सलमानला तुरूंगातही जावे लागेल. परंतु तीन वर्षांपेक्षा कमी शिक्षा झाल्यास मॅजिस्ट्रेट न्यायालयातच या प्रकरणाची सुनावणी होईल. त्यामुळे सलमान लगेचच जामिनासाठी अर्ज करून सुटू शकतो.
१९९८ मध्ये ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अभिनेता सलमान खान जोधपूरला आला होता. त्यावेळी काळवीटाची शिकार केल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. शिकार झाली तेव्हा सलमानच्या गाडीत अभिनेत्री नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि अभिनेता सैफ अली खानही होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *