Vinod-Tawde-2-600x310

दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होणार – शिक्षणमंत्री विनोद तावडे

शिक्षण

दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होणार आहे, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी व्यक्त केला.बालभारतीच्या दहावीच्या अभ्यासक्रमाच्या नवीन पाठयुपस्तकांसोबत उपलब्ध होणा-या भाषा आणि भाषेतर विषयाच्या स्वतंत्र मूल्यमापन पुस्तिकेमुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे याचा तपशील समजणार आहे.
दहावीच्या नव्या अभ्यासक्रमात नेमकं काय-काय नवीन आहे, याची उत्स्कुता विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक आणि पालकांनाही आहे. नव्या अभ्यासक्रमाची ओळख व्हावी, त्याचं स्वरुप विद्यार्थ्याना समजावं यासाठी बालभारतीनं चर्चासत्राचं आयोजन केलं आहे.दादरमधल्या शिवाजी मंदिरात होणाऱ्या या चर्चासत्राला शिक्षणमंत्री विनोद तावडे हजेरी लावणार आहेत.
२०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून दहावीच्या नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके बाजारात उपलब्ध झाली आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने अभ्यासमंडळातील विशेष तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत.

एसएससी आणि सीबीएसई या दोन्ही मंडळांच्या अभ्यासक्रमांमध्ये जास्त फरक नसतो. सीबीएसई मंडळाच्या तुलनेत एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्येही अधिक वाढ व्हावी यादृष्टीने बालभारतीच्या नवीन अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आला असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यामुळे सीबीएससी आणि आयसीएससीच्या विदयार्थ्यांना एसएससी बोर्डाचे विद्यार्थी सामना करु शकतील असा विश्वासही असेही तावडे यांनी व्यक्त केला. नवीन अभ्यासक्रमाच्या प्रत्येक पुस्तकातील धडयांमध्ये क्यूआर कोडचा समावेश करण्यात आला असून या डिजिटल पध्दतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक व सविस्तर माहिती इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकेल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *