murder2_647_071417083415

वृद्धेकडून ७५ वर्षीय पतीची हत्या

मुंबई

सतत टोचून बोलतो, सर्वांसमोर मारहाण करतो, कधीच चांगली वागणूक देत नाही, शिवाय परिसरातील महिलांशी लगट करतो म्हणून संतापलेल्या पत्नीने वृद्ध पतीच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घातल्याची घटना टिळकनगरमध्ये घडली. छोटेलाल बुद्धिराम मोर्या (७५) असे त्या वृद्धाचे नाव असून त्यांचा जागीच मृत्यू झाला. टिळकनगर पोलिसांनी आरोपी आरोपी महिला धनुदेवी (६५) हिला अटक केली आहे.
छोटेलाल यांच्या डोक्यावर धारदार वस्तूने प्रहार करुन त्यांची हत्या झाल्याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली. बाहेरील व्यक्तीने घरात प्रवेश केला नसल्याचं तपासात समोर आल्यामुळे धानूदेवींवर पोलिसांचा संशय बळावला.
मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला होता. मात्र छोटेलाल यांचं कोणाशीही वैर नसल्याचं त्यांच्या मुलांनी सांगितलं. पत्नीसोबत छोटेलाल यांचे वारंवार खटके उडत असल्याचं पोलिस तपासात समोर आलं.
अखेर, दोन शेजारी महिलांसोबत छोटेलाल यांचे संबंध असल्याच्या संशयातून आपण पतीची हत्या केली, अशी कबुली धानूदेवींनी दिली. जेवणानंतर छोटेलाल झोपलेले असताना धानूदेवींनी त्यांच्या डोक्यावर पेव्हर ब्लॉकने वार केला. पतीची शुद्ध हरपल्याचं लक्षात येताच धानूदेवींनी पळ काढला.
मौर्य दाम्पत्याच्या मालकीची चार दुकानं असून ते त्याच्या वर असलेल्या खोलीत राहत होते. घराजवळ एका हातगाडीवर ते कांदे-बटाटे विकायचे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *