cricket-bat-generic_650x400_41466798041

मुंबई क्रिकेट असोशिएशनला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका

क्रीडा

मुंबई क्रिकेट असोशिएशनला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिलाय. मुंबई क्रिकेट असोशिएशनवर २४ तासाच्या आत प्रशासक नेमा, असे कठोर आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. लोढा समिती शिफारसींच्या अंमलबजाणीत चालढकल केल्याचा दावा करणारी जनहित याचिका मंगळवारी उच्च न्यायालयासमोर सुनावणीला आली. यादरम्यान उच्च न्यायालयाने हे कठोर आदेश दिलेत.
लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यास आपण तयार आहोत. त्या लागू करण्याच्या दृष्टीनेच एमसीएच्या घटनेत दुरूस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या दुरूस्तीला मान्यता मिळवण्यासाठी एमसीएची १६ एप्रिलला बैठक होणार आहे, असा दावा ‘एमसीए’तर्फे न्यायमूर्ती शंतनु केमकर आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी करण्यात आला. त्यावर ‘एमसीए’तर्फे हा दावा गेल्या कित्येक महिन्यांपासून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र या शिफारशी लागू करण्यासाठी काहीच केले जात नसल्याबाबत न्यायालयाने ‘एमसीए’ला सुनावले. या शिफारशी लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली मुदत संपून काळ लोटला आहे, तरीही तुम्ही त्याच्या अंमलबजावणीसाठी मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा करत आहात, असेही न्यायालयाने ‘एमसीए’ला फटकारले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *