Monsoon_Rain_weather_monsoon_rain-770x433

यंदा देशभरात समाधानकारक मान्सून – स्कायमेटचा अंदाज

देश

यंदा देशभरात समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेट या संस्थेने वर्तवला आहे. ‘स्कायमेट’ने दिलेल्या माहितीनुसार, २०१८ मध्ये नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनची दीर्घकाळातील सरासरी ही समाधानकारक राहील. यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतात. मात्र, या गोष्टी वगळता जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात सरासरी ८८७ मिमी पाऊस पडेल, असे ‘स्कायमेट’ने म्हटले आहे.
हवामान खात्याच्या पावसाविषयीच्या अंदाजाकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले असते. या अंदांजावर बाजारपेठेत अनेक चढउतारही पाहायला मिळतात. साहजिकच स्कायमेटने आज जाहीर केलेल्या अंदाजामुळे शेतकरी आणि उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, भोपाळ, इंदौर, जबलपूर आणि रायपूर या शहरांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे स्कायमेटने म्हटले आहे.
जून ते सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक पाऊस जून आणि सप्टेंबरमध्ये पडणार, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *