709944370

भारतात 5, 10, 20, 50 आणि शंभरसह सर्वच नोटा जीवाणू बाधित आहेत.दुनिया पैशांवर चालते आणि पैशांची भाषा बोलते म्हणतात.. पैशाशिवाय तुमचं पानही हलत नाही. जिथे जाल तिथे हातात नोटा खेळवाव्याच लागतात.भारतातील सर्वच नोटा जीवाणू बाधित आहेत. आपण अशाप्रकारे रोज कित्येक वेळा नोटा हाताळत असतो. पण याच नोटा तुमच्या जिवावर उठू शकतात. असा दावा फूड सेफ्टी अँड स्टँटर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया करत आहे.
बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी – – पैसे मोजा, पेट्रोल, डिझेल भराचयं – पैसे मोजा, साधी पाणीपुरी खाल्ली तरी पैसे मोजावे लागतात आणि एटीएम मधून आलेले – पैसेही मोजायचेच असतात.
पाच प्रकारांचे जीवाणू नोटांवर आढळतात. त्यात ई कोलाई, स्टेफाइलोकोकस, स्लमोनेला एंट्रीटाइडिस, स्ट्रेप्टोफोकस, प्रोटियस असे जीवाणू असतात. या जीवाणूंमुळे प्रतिकारक क्षमता कमी होते. नोटांमुळे आजारी पडण्याचा फूड सेफ्टी अँड स्टँटर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने केलेला दावा खरा आहे. लोकांच्या संपर्कात या बाधित नोटा आल्याने गंभीर आजार होत आहेत. या जिवाणूंचा सर्वात जास्त धोका लहान मुले, महिला आणि वृद्धांना होतो.
कोणत्याही स्वरुपात नोटांच्या संपर्कात आल्याने जीवाणू आपल्या खाण्या-पिण्याद्वारे आपल्या पोटात जातात. त्यामुळे आजारी पडण्याची धोका आणखी बळावतो. त्यामुळे नोटांना स्पर्श केल्यानंतर व्यवस्थित हात धुणे गरजेचे आहे. हा धोका टाळण्यासाठी खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांनी स्वच्छतेचे काटेकोर पालन करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *