2018-04-03-3

बिबट्याशी झुंज देऊन स्वत:चे आणि आईचे प्राण वाचवले

महाराष्ट्र

भंडाऱ्याच्या उसगावमध्ये शेळीच्या शिकारीसाठी घराच्या आवारात शिरलेल्या बिबट्याला मोठ्या हिमतीने एका युवतीने परतवून लावलं. बिबट्याशी झुंज करत स्वतःसह आणि आपल्या आईचे प्राण तिने वाचवले. रुपाली मेश्राम असं युवतीचं नाव आहे.
गेल्या आठवड्यात रात्रीच्या सुमारस रुपाली मेश्राम या तरुणीच्या घरात बिबट्या शिरला. अंगणात बांधलेल्या शेळीवर बिबट्यानं हल्ला केला होता. शेळीच्या आवाजानं रुपाली आणि तिची आई अंगणात आली. मात्र याचवेळी बेसावध असलेल्या दोघींवर बिबट्यानं हल्ला चढवला. रुपालीनं प्रसंगावधानता दाखवून काठीने बिबट्याला हुसकावून लावलं. अखेर या वाघीणीपुढे बिबट्यानं माघार घेत जंगलात धुम ठोकली. मात्र या हल्ल्यात रुपाली आणि तिची आई गंभीर झाली. रुपालीनं तातडीनं याची माहिती वनविभागाला दिली. वन अधिकाऱ्यांनी रुपाली आणि तिची आई जिजाबाई यांना प्राथमिक उपचारांकरता साकोली रुग्णालयात दाखल केले होते. मात्र रुपालीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. रुपालीला आठवडाभरानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र रुपालीच्या धाडसाचं राज्यभर कौतुक होत आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *