DZyaRrkWAAAxFVm

‘बागी २’ चित्रपटाची बॉक्सऑफिस घोडदौड

मनोरंजन

टायगर श्रॉफच्या ‘बागी 2’ या चित्रपटाची बॉक्सऑफिसवरील घोडदौड सुरू आहे. पाचव्या दिवशी या चित्रपटाने 11 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट अवघ्या 5 दिवसातच 100 कोटीच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे.
पद्मावत चित्रपटाचा पहिल्या दिवसांचा कलेक्शनचा रेकॉर्ड मोडत ‘बागी 2’ हा चित्रपट अव्वल ठरला आहे. पहिल्याच दिवशी ‘बागी 2’ या चित्रपटाने 25 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे 2018 च्या टॉप विकेंड ओपन फिल्ममध्ये या चित्रपटाचा समावेश झाला आहे.
चाहत्यांना टायगर श्रॉफची स्टंटबाजी आणि दिशा पटनीसोबतची केमेस्ट्री भावली आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे.
या चित्रपटात टायगर रणवीर प्रताप सिंग उर्फ रॉनीच्या भूमिकेमध्ये आहे. रॉनी या चित्रपटात कमांडो दाखवला आहे. तर नेहा(दिशा) रॉनीची कॉलेजमधली प्रेमिका आहे. नेहाचं लग्न दुसऱ्याबरोबर झाल्यावर ती रॉनीला ४ वर्षांनी भेटते. नेहा रॉनीला तिच्या किडनॅप झालेल्या मुलीला शोधण्यासाठी मदत मागते आणि चित्रपटामध्ये सगळी अॅक्शन सुरु होते.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *