4ba79e5-kingston-university-fdb7bf0-fakenews

फेक न्यूज संदर्भातील पत्रकारांवरील कारवाईचा निर्णय मागे

देश

फेक न्यूज अर्थात खोट्या बातम्या देणाऱ्या पत्रकारांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार नाही. गेल्या काही तासांपूर्वीच सरकारनं हा नियम लागू केला होता. अखेर वाढता विरोध पाहता सरकारनं हा निर्णय मागे घेतला आहे.

या नियमानुसार, पहिल्यांदा फेक न्यूज दिल्यास सहा महिन्यांसाठी, दुसऱ्यांदा नियम मोडल्यास एका वर्षासाठी, तर तिसऱ्यांदा नियमाचं उल्लंघन केल्यानंतर पत्रकाराची कायमस्वरूपी मान्यताच रद्द केली जाणार होती. परंतु सरकारवर हा निर्णय मागे घेण्याची नामुष्की ओढावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशानंतर माहिती व प्रसारण मंत्रालयानं हा निर्णय मागे घेतला आहे. आता फक्त प्रेस काऊन्सिलमध्येच अशा प्रकरणांवर सुनावणी होणार आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *