aim_bn_1310726653

आज अंगारकी चतुर्थी निमित्त मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

मुंबई

aim_bn_1310726653

अंगारकी चतुर्थी निमित्तानं राज्यभरातल्या गणपती मंदिरांमध्ये भाविकांनी आज गर्दी केली आहे. मुंबईतल्या प्रभादेवीमधल्या सिद्धिविनायक मंदिरात रात्रीपासूनच भाविकांच्या रांगा लागल्यात. अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिर रात्रभर भाविकांसाठी खुलं करण्यात आले आहे.अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांसाठी वेगळ्या रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय गर्दी टाळण्यासाठी मुखदर्शनाची सोयही करण्यात आली.
सिद्धिविनायक मंदिर आज मध्यरात्री १२ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे. सोबतच मंदिर प्रशासनाकडून भक्तांच्या सोयीसाठी दादर, एल्फिन्स्टन स्थानकाहून मोफत बस सेवा पुरवण्यात येत आहेत.
दुसरीकडे भाविकांच्या सुरक्षेततेसाठी सिद्धिविनायक मंदिर प्रशासनानं चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *