Pune-engineer-Suicide

संगणक अभियंत्याची गोळी झाडून आत्महत्या

महाराष्ट्र

Pune-engineer-Suicide

पिंपरी चिंचवडच्या वाकडमध्ये एकाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आनंद यादव असं त्यांचं नाव आहे. त्याने तणावातून हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे मयत आनंद याने काही महिन्यांपूर्वी डिप्रेशन थेरेपी घेतली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड मधील रिदम या सोसायटीमध्ये संगणक अभियंता आनंद यादव (वय-३५) यांनी डोक्यात पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्या केली आहे.ही घटना सकाळी सहाच्या सुमारास घडली.गोळी झाडली तेव्हा वहिनीला आवाज आला परंतु काही वेगळं असावं म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यानंतर सकाळी आठ वाजता आनंदला उठवण्यास गेले तेव्हा हा प्रकार समोर आला आहे.आनंद यादव याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात बाथरूम मध्ये पडलेला होता. गेल्या सहा महिन्यापासून मयत आनंद हा त्याचा छोटा भाऊ आणि वहिनीसोबत रिदम या सोसायटीत राहात होता.
विशेष म्हणजे आनंदने काही महिन्यांपूर्वी डिप्रेशन थेरपी घेतली होती.त्यानंतर आज सकाळी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले आहे. आनंद याचा विवाह झाला होता परंतु पत्नीचे आणि त्याचे नेहमी किरकोळ कारणावरून खटके उडायचे यामुळे काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला होता. ताणतणावातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *