800px-PremierPadminiTaxis_gobeirne

मुंबईकरांना मोठा दिलासा,रिक्षा, टॅक्सीचे दर वाढणार नाही

मुंबई

800px-PremierPadminiTaxis_gobeirne

मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी आहे. सीएनजीचे दर एक एप्रिलपासून वाढले असले तरी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मात्र दरवाढीची मागणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. एक एप्रिलपासून मुंबईत सीएनजीच्या दरात सात ते आठ पैशांची वाढ झाली आहे. पण त्याचा कुठलाही भार प्रवाशांवर लावण्यात येणार नाही असं रिक्षा आणि टॅक्सी चालक युनियननं म्हटलं आहे.
मुंबईत ५५००० टॅक्सी आणि १ लाख ३९ हजार रिक्षा चालक आहे. सीएनजीच्या दरवाढीचा फटका एकूण ५ लाख ६० हजार वाहनं आणि साधारण साडे नऊ लाख घरगुती वापर करणाऱ्यांना बसणार आहे.

 

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *