34ecd612bb44bb4a7d77ecc5bfae67f2

34ecd612bb44bb4a7d77ecc5bfae67f2

भारत बंद दरम्यान देशातील अनेक शहरांमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. मध्य प्रदेशमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने एस.सी, एस. टी. अॅट्रॉसिटी अॅक्ट विषयी दिलेल्या आदेशांच्या विरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे.
या आदेशवर नाराज झालेल्या दलित संघटनानी सोमवारी भारत बंदची हाक दिली होती. तर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
महाराष्ट्रात मुंबई-ठाणे-पुणे-नागपूर भागात याचा कोणताही परिणाम दिसला नाही. मात्र उत्तर महाराष्ट्रातील काही भागात बंदला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. तसंच देशातील काही भागांमध्येही या बंदला हिंसक वळण लागलं आहे.
मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये हिंसाचार
देशभरात सुरू असलेल्या हिंदुस्थान बंद आंदोलनाला हिंसक वळण लागले असून अनेक ठिकाणी गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. मध्यप्रदेशच्या ग्वालियर आणि मरैनामध्ये आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात ४ लोकांचा मृत्यू झाला. तसेच राजस्थानमधील अलवरमध्ये पवन कुमार नावाच्या तरुणाचा गोळीबारामध्ये मृत्यू झाला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *