dc-Cover-i4a616d96428okdtu95bqsc115-20180402111039.Medi

पंतप्रधान कार्यालयाने का मानले सचिन तेंडुलकरचे आभार !

देश

dc-Cover-i4a616d96428okdtu95bqsc115-20180402111039.Medi

क्रिकेटचा देव आणि भारतरत्न खासदार सचिन तेंडुलकर यानं खासदार म्हणून मिळणारं, वेतन तसंच भत्ते यांची रक्कम, पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये जमा केली आहे.त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाने सचिन तेंडुलकरचे आभार मानले आहेत. गेल्या सहा वर्षाच्या कार्यकाळातील सचिनने आपला संपूर्ण पगार व महिन्याचे भत्ते असे मिळून एकूण ९० लाख रुपये त्याने पंतप्रधान निधीला दान केले आहेत.
सचिनने कार्यकाळ संपल्यानंतर केलेल्या या कामामुळे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. त्याचबरोबर सचिनच्या पावलाचे पंतप्रधान कार्यालयातूनही कौतुक करण्यात आले आहे. यामुळे पंतप्रधान कृतज्ञ असून अनेकांना या मदतीमुळे फायदा होणार असल्याचे, पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *