mother-696x447

गोरा मुलगा पाहिजे, आईने मुलाला दगडाने घासलं !

देश

mother-696x447

दत्तक घेतलेलं मूल सावळं असल्याने एका आईने त्याच्या अंगावर दगड घासण्याचा संतापजनक प्रकार भोपाळ येथे घडला आहे. सुधा तिवारी असं आरोपी महिलेचं नाव असून तिने मुलाला दत्तक घेतलं होतं. गोरं करण्यासाठी महिला त्याचं शरीर दगडाने घासत होती, अशी माहिती चाईल्ड लाईनला मिळाली होती. त्यानंतर पोलिस आणि चाईल्ड लाईनने या मुलाची सुटका केली. महिलेच्या मोठ्या बहिणीच्या मुलीने ही माहिती चाईल्ड लाईनला दिली होती.
आरोपी महिलेने उत्तराखंडच्या मातृछायामधून दीड वर्षांपूर्वी या मुलाला दत्तक घेतलं होतं. आरोपी सुधा तिवारी व्यवसायाने शिक्षिका असून ती सरकारी शाळेत शिकवते. तर महिलेचा पती खासगी रुग्णालयात काम करतो.
“सुधाने ज्या दिवसापासून मुलाला भोपाळमध्ये आणलं, त्यादिवसापासून तिला त्याचा सावळा रंग पटत नव्हता. तिने मुलावर खूप उपचार केले. सुमारे एक वर्षापूर्वी कोणीतरी तिला सल्ला दिला की, मुलाला काळ्या रंगाच्या दगडाने घासलं तर तो गोरा होऊ शकतो. यानंतर महिलेने मुलाचं शरीर काळ्या रंगाच्या दगडाने घासायला सुरुवात केली. पण यामुळे मुलाच्या मनगट, खांदा, पाठ आणि पायांना जखम झाली आहे.
पोलिसांनी त्वरित कारवाई करत मुलाची सुधाच्या तावडीतून सुटका केली. दगडाने अंग घासल्यामुळे त्या मुलाच्या त्वचेवर जखमा झाल्या होत्या. त्याच्यावर उपचार करून आता त्याला बालआयोगाकडे सुपूर्द करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *