Nirmala-Sitharam-PTI

नीरव मोदी आणि मेहुल चोकसीला परत आणणार – संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन

देश

Nirmala-Sitharam-PTI

पंजाब नॅशनल बँकेत १२,६०० कोटींचा घोटाळा करुन फरार झालेल्या नीरव मोदी आणि मेहुल चोकसीला सरकार भारतात परत आणणार आहे असा विश्वास केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे.
नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी घोटाळा करून परदेशात पळाले आहेत. परंतु, त्यांना देशात परत आणण्याचं काम केंद्र सरकार करेल, असं सीतारामन म्हणाल्या. जीएसटी लागू केल्यानंतर सुरुवातीला थोड्या अडचणी आल्या. आर्थिक सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध असून जीएसटीसारखे धाडसी निर्णय या सरकारने घेतले आहे, असे सीतारामन यांनी सांगतले.
सरकारमध्ये भ्रष्टाचारासारखा कोणताही घटक नसून, सरकारचे सर्व निर्णय योजनांवर आधारित आहेत. भ्रष्टाचारमुक्त सरकार म्हणजे पैसा योग्य ठिकाणी आणि योग्य लोकांसाठी खर्च होत आहे’, असंही त्या बोलल्या आहेत. तसंच डिजिटायजेशमुळे लोकांना थेट फायदा मिळत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *