dog

पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत

Uncategorized

dog

महापालिकेच्या राेजच्या अहवालानुसार जानेवारी अाणि फेब्रुवारी या केवळ दाेन महिन्यात पुण्यातील तब्बल दाेन हजार पासष्ट नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समाेर अाले अाहे. यात लहान मुलांचे प्रमाण अधिक असून यामुळे पालकांच्या चिंतेत वाढ झाली अाहे. लहान मुलांना भटकी कुत्री चावल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही महिन्यांपासून घडली अाहेत. त्याचबराेबर दुचाकींच्या मागे ही भटकी कुत्री लागल्यामुळे अनेकांचे अपघातही झाले अाहेत. यंदाच्या वर्षी महापालिकेच्या अहवालानुसार जानेवारीमध्ये ८२१ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला हाेता तर फेब्रुवारी महिन्यात तब्बल १२४४ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला हाेता.
या भटक्या कुत्र्यांच्याविराेधात पालिका प्रशासन पाऊले उचलत असलं तरी ती पुरेशी नसल्याचे दिसून येत अाहे. उघड्यावर फेकण्यात येणारा कचरा, फेकण्यात येणारे खरकाटे अन्न यांमुळे या भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत अाहे. पालिका प्रशासनाला या कुत्र्यांची नसबंदी करताना अनेक गाेष्टी लक्षात घ्याव्या लागत असल्याने हा उपाय पुरेसा उपयाेगी पडत नसल्याचे चित्र अाहे. तसेच काही नागरिकांकडूनही या भटक्या कुत्र्यांना अन्न टाकण्यात येत असल्याने साेसायटींच्या बाहेरही त्यांची संख्या वाढत अाहे. कुत्रा चावल्याने रेबिज सारखे अाजार हाेत असल्याने तसेच इंजेक्शनचा काेर्स करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये या कुत्र्यांबद्दल धास्ती निर्माण झाली अाहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *