temperature

पहा कुठे झाली देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद

कोकण

temperature

रायगड जिल्ह्यातील भिरा इथं गेल्या 24 तासात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. भिऱ्यातील कालचं तापमान 45 अंश सेल्सियस इतकं होतं. स्कायमेटने याबाबतची माहिती दिली.
गेल्या वर्षी 28 मार्चला भिरा इथले तापमान हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे म्हणजेच 46.5 इतके होते. त्यावेळी वेधशाळेची अनेक पथके भिरा इथे दाखल झाली होती.
केवळ मुंबईच नाही तर उष्णतेची झळ संपूर्ण राज्याला बसली आहे. उष्णतेमुळे मराठवाडा आणि विदर्भातील तापमानने चाळीशी ओलांडली आहे. ब्रम्हपुरी, अकोला वर्धा, सोलापूर, परभणी इथं तापमान जवळपास 40 अंश सेल्सियसच्या आसपास नोंदले गेले. तर अहमदनगर, नागपूर, नाशिक, नांदेड, पुणे, सांगली, सातारा, वेंगुर्ला येथेही तापमान 37 ते 39 अंश होते.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *