31940_1194

दिग्दर्शक रवी जाधव यांच्या बहुचर्चित न्यूड या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

मनोरंजन

31940_1194

दिग्दर्शक रवी जाधव यांच्या बहुचर्चित न्यूड या चित्रपटाची गेल्या काही महिन्यांपासून बरीच चर्चा झाली होती. चित्रपटाच्या नावावरूनही अनेकांच्या मनात कुतूहलाची भावना जागी झाली होती. त्यात इफ्फीमधून वगळला गेल्यामुळेही न्यूड चांगलाच चर्चेत आला होता. चित्रकारांसाठी न्यूड मॉडेलचं काम करणाऱ्या स्त्रीच्या आयुष्यावर केंद्रित अशी ओळख असलेल्या या चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने उत्सुकता चांगलीच ताणून धरली आहे.
नसीरुद्दीन शहा यांच्या आवाजातील, ‘हर इन्सानमें खुदा है और खुदामें इन्सान’ या वाक्याने सुरुवात झालेल्या या ट्रेलरमध्ये मानवी जीवनातले अनेक रंग पाहायला मिळताहेत. आयुष्याचा संघर्ष करताना न्यूड मॉडेल म्हणून काम कराव्या लागणाऱ्या दोन स्त्रियांची ही कथा आहे.झी स्टुडिओज निर्मित आणि रवी जाधव दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *