280314-203972-126797-reliance-jio11

जिओच्या प्राईम मेंबरशिप ऑफरची मुदत ३१ मार्च २०१८ रोजी संपणार, पुढे काय होणार ?

व्यापार

280314-203972-126797-reliance-jio11

जिओच्या प्राईम मेंबरशिप ऑफरची मुदत ३१ मार्च २०१८ रोजी संपणार आहे. त्यामुळे पुढे काय, असा प्रश्न जिओच्या ग्राहकांना पडला आहे.या मेंबरशिपची वॅलिडीटी १ वर्ष होती. जिओ प्राईम मेंबरशिपची सुरुवात १ एप्रिल २०१७ला झाली होती. १ मार्च २०१८ पर्यंत त्याची मुदत आहे. आता सब्सक्रिप्शनची तारीख संपणार आहे. त्यामुळे आता लवकरच नवीन घोषणा होऊ शकते. पण याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. पण अशी आशा आहे की कंपनी प्राईम सब्सक्रिप्शन पूर्णपणे बंद करुन नवीन ऑफर आणू शकते.
रिलायन्स जिओने स्वस्त इंटरनेट डेटा आणि मोफत व्हॉईस कॉलनंतरही ग्राहकांना बांधून ठेवण्यासाठी प्राईम मेंबरशिपची आयडिया आणली होती. आता प्राईम मेंबरशिपची मुदतही संपते आहे. त्यामुळे आता जिओ काय घेऊन येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *