temperature (1)

उन्हाच्या झळांनी मुंबईकर हैराण

मुंबई

temperature (1)

४८ तासात मुंबई, पुणे आणि नाशिक या तिन्ही प्रमुख शहरांमध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. सोमवारीही उन्हाच्या झळांनी मुंबईकर हैराण झाले होते. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत सोमवारीही पारा ४० अंशांच्या वर होता. मुंबई नाशिक आणि पुणे या तिन्ही शहरांमध्ये उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे मार्च महिना संपतानाच लोकांना उन्हाच्या झळा बसत आहेत.
महाराष्ट्रातील भिरा येथे नोंद झालेले ४५ अंश से. तापमान देशभरातील सर्वाधिक तापमान ठरले. मुंबई आणि उपनगरांमधील नागरिकांना सोमवारी उष्णदाह सहन करावा लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *