280089-216028-siberia-shopping-mall1

रशिया सायबेरियात शॉपिंग सेंटरला भीषण आग, ६४ लोकांचा मृत्यू

विदेश

280089-216028-siberia-shopping-mall1

रशियातील सायबेरिया शहरातल्या कॅमरोव्हो भागात एका शॉपिंग सेंटर भीषण आग लागून ६४ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेक जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.अग्निशमन दलाचे कर्मचारी बराच वेळ आग विझविण्याचा प्रयत्न करत होते.
स्थानिक प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार विंटर चेरी मॉलच्या चौथ्या मजल्यावरून ही आग सुरू झाली. जिथं एक एंटरटेन्मेंट कॉम्प्लेक्स आणि चित्रपटगृह आहे. आग लागली तेव्हा तिथं एक सिनेमा सुरू होता.
दरम्यान, अद्याप आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही. तेथील स्थानिक टेलिव्हिजन वाहिन्यांवर दाखवल्या जात असलेल्या आगीच्या दृश्यांमध्ये लोक धुरातून वाट काढत मॉलच्या खिडक्यांमधून उड्या मारतानाही दिसले. आत अडकलेल्या लोकांमध्ये लहान मुले मोठ्या संख्येने आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *